महाशिवरात्रीची कथा



नमस्कार मी gunjan choudhari आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. हि कथा महाशिवरात्रीच्या दिवशी ऐकल्याचे खूप फायदे आहेत. हि शिवपुराणात आलेली कथा आहे. एका गावात एक शिकारी राहत होता. एके दिवशी शिकारी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार मिळाली नाही. शिकार्याला खूप भूक लागली होती. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला शिकारी  बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन शिकार्याला  म्हणाला

‘हे शिकारी तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने शिकाऱ्याने ने त्यांची विनंती मान्य केली.जवळच्या मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय - ओम नमः शिवाय कानावर येत होते. शिकारी  ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.

सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता आणि योगायोग म्हणजे त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

हरीण परत आल्यानंतर त्याने शिकार्याला ला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे.  तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’

ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . .

मित्रांनो महाशिवरात्रीला उपवास करून भोलेनाथ शिवशंकराची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. ओम नमः शिवाय – 


अजूनही आपण माझ्या यु ट्यूब channel ला सबस्क्रायब केले नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद

 https://www.youtube.com/channel/UC4wt4C3OM7Qfher-F8bWb3g