SGSP account - State Government Salary package

SGSP

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना - स्टेट बँक द्वारा चालू असलेल्या  SGSP Account म्हणजेच (State Government Salary Package) चे फायदे.



SGSP या योजनेअंतर्गत 4 प्रकारची खाती उघडली जातात.ती खालील प्रमाणे आहेत.

1) SILVER :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹5000 ते ₹20000 आहे.

2) GOLD :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹20000 ते ₹50000 आहे.

3) DIAMOND :- वर्ग 2 चे अधिकारी ( उदा. राजपत्रित अधिकारी)
ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹50000 ते ₹100000 आहे.

4) PLATINUM :- वर्ग 1 चे अधिकारी ( उदा.आयुक्त,जिल्हाधिकारी,सचिव इ.)
 ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार ₹100000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

SGSP चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

Zero बॅलन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाहीत.

●कोणत्याही बँकेच्या ATM वरून पैसे कितीही वेळेस काढल्यास चार्जेस लागत नाहीत.

●मागणी नुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.

●20 लाख रुपये पर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)

● विमान अपघात प्रकरणी 30 लाखा पर्यंत विमा संरक्षण.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)

● पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते.

● बँकेत लॉकर चार्जेस मध्ये 25% सूट

●बँकेत जमा रक्कम E-Mod द्वारे Deposit होऊन जमेवर व्याज जास्त मिळते.

डिमॅट ( D-MAT) अकाउंट सेवा उपलब्ध होईल.(शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी)

 ●DD काढणे,चेक बुक ,SMS सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत.( उदा. NEFT/RTGS)

●डेबिट कार्ड आणि YONO SBI  वर मिळणाऱ्या ऑफर्स ची माहिती बँक वेळोवेळी देत राहील.

कर्मचाऱ्यास 2 महिन्याच्या पगारी एवढा Overdraft मागणी नुसार देईल.( ही सुविधा सध्या मोजक्याच ग्राहकांसाठी उपलब्ध)
-------------------------------------------------
बँकेत जमा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
बँकेत खालील कागदपत्रे जमा केल्यास आपले आहे तेच अकाउंट SGSP मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी विनंती करावी.
1) अर्ज साध्या कागदावर
2) पगार दाखला - ऑनलाइन काढला असल्यास DDO च्या सहीची आवश्यकता नाही
3) पासबुक झेरॉक्स
4) Pan Card झेरॉक्स
5) आधार कार्ड झेरॉक्स

(साभार : https://www.sbi.co.in/)