लस आजची अन् तेव्हाची..
मित्रांनो - आपल्या लहानपणी, आज शाळेत लस देणारे येणार आहे म्हटलं, की आरोग्य खात्याची जीप आत घुसताच पहिले PT मास्तर एका चपराश्याला मेन गेट बंद करायला लावायचे. आणि बाई वर्गात येऊन सर्वांना रांगेत उभे करायच्या..लगेच आमच्या टेबल-बेंच वरून पुस्तके, वह्या, दप्तर बाजूला करून त्यावर सुया उकळणारे भांडे ठेवले जाई..मग काय बघता? जो भोकांड पसरणं सुरू व्हायचं, की काही बोलायचं कामच नाही. कोणी खिडकीतून उड्या मारणार, कोणी जमिनीवर लोळणार, एकसे एक प्रकार..
जो खिडकीतून बाहेर पडला, त्याला इतिहासाचे शिंदे मास्तर खिंडीत गाठायचे, अन् झोडपत वर्गात आणून फेकायचे! अगदी इंग्रज जेलरने क्रांतिकारकांना कालकोठडीत फेकल्याचा प्रसंग आठवायचा!आजच्या लसीकरणात लोकांना काही सिरियसनेसच नाही, चक्क दात दाखवून फोटो काढत आहेत!योगायोग पाहा, तीच जुनी पिढी सेल्फी काढत आज लस घेत आहे. तरी किती फरक पडला, नाही ?