आभार

वाढदिवसानिमित्त आपल्याल्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचे एकाच पोस्ट मध्ये आभार खालील माहिती वापरून मानु शकतात. 

धन्यवाद सर्वांचे...

काल आपण सर्वांनी मला  प्रत्यक्ष भेटुन तसेच कॉल,

whatsapp मॅसेज, फेसबुक वरील शुभेच्छा , व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासुन आभार व्यक्त करतो . आपल्या सर्वांचे प्रेम बघून  मी अक्षरशः भारावुन गेला  आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कुठल्याशा एका लहान  खेडेगावातुन आलेल्या माझ्यासारख्या साध्या माणसाला आपण आजपर्यंत जे प्रेम दिले , ज्या पद्धतीने सांभाळुन घेतलंत त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी माझ्याकडे खरच शब्द नाहीत. आपली ही साथ आणि प्रेम असंच कायम राहु द्यावे  एवढंच मागणं आपल्याकडे मागतो.

मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातुन असंख्य जिवलग मित्र  भेटले. या विचारधारेत आल्यापासुन समाजासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या महामानवांच्या विचारांची ओळख पटली. तेव्हापासुनच त्यांच्या विचारांशी माझी नाळ जोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. आयुष्यात पुढची वाटचाल करत असताना त्यांच्या विचारांची शिदोरी मी कायम सोबत ठेवीन.

आपण सर्वांनी काल मला शुभेच्छा देताना माझ्याबद्दल चांगले शब्द वापरले, हा आपल्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपल्यासारखे लोक भेटत गेले म्हणुन जगण्यातली दुःखं कधी जाणवलीच नाहीत. आपल्या सर्वांच्या सानिध्यात राहुनच कुठल्याही परिस्थितीत खचुन जायचं नाही हे स्वतःला सांगत राहिलो. “जिंदगीडॉटकॉम” असो किंवा “छत्रपती सुत्र” असो, त्या आतुन आलेल्या प्रामाणिक प्रतिक्रिया आहेत, फक्त लेखणीच्या माध्यमातुन व्यक्त झाल्या. त्याद्वारेच आजपर्यंत स्वतःला प्रोत्साहित करत आलो आहे. त्यातुनच जगण्याचा अर्थ समजुन घेत आलो आहे. माझ्या जगण्यातील हा अर्थ आपण आपल्या जगण्याशी जोडुन त्याचा जो सन्मान केला, तो मला बळ देणारा आहे. खरंतर हीच माझ्यासाठी जिंदगीडॉटकॉम आहे आणि हेच माझ्या जगण्याचे छत्रपती सुत्र आहे.

आयुष्य हे चौफेर असावं. निदान सोशल माध्यमांवर तरी सामाजिक भान, उत्तरदायित्व, प्रबोधन याबरोबरच निखळ आयुष्याचा आनंद घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यात आपल्या सर्वांची असणारी साथ मला कायम प्रोत्साहन देते.

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणुन ग्रामीण भागात काम करत असताना शेतकरी, कष्टकरी समाजाच्या व्यथा जवळुन अनुभवत आहे. सगळीकडे हेच चित्र कमी जास्त फरकाने जाणवते. या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता यावे, त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा प्राप्त करुन देता यावी हे आपल्या सर्वांपुढचे आव्हान आहे. त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहुया.


आभार