संस्कार

 🔹 याला म्हणतात संस्कार 🔹

लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीचे माहेरवाशीणपण आठवडाभर चालले.  सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.परत सासरी जातांना वडिलांनी तीला सुगंधी, दरवळणारा अगरबत्ती पुडा दिला व जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा, असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली असे अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते.
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सगळ्या वस्तु बघितल्या.आणि अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा ऊघडला. आत एक चिठ्ठी होती.

"बेटा ही अगरबत्ती स्वतः जळते पण पुर्ण घराला सुगंधी करून जाते. एवढंच नाही तर आजुबाजुचा परिसर ही दरवळुन टाकते. तशी तु काही वेळा नाराज होशील, सासु-सासऱ्यांवर नाराज होशील, शेजार चे नाराज होतील. तेव्हा माझी भेट लक्षात ठेव. स्वतः जळतांना अगरबत्ती जसं संपुर्ण घराला सुंगधी बनवते, तशी तू सासरला बनव."

मुलगी चिठ्ठी वाचुन रडायला लागली. सासू धावतच जवळ आली. नवरा सासरे देवघरात डोकावले.

ती फक्त रडत होती, अगं ! हात पोळला का? नवऱ्याने विचारले.
काय झालं ते तरी सांग. सासरे  म्हणाले. सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का? ते बघु लागली. तेव्हा वळणदार  अक्षरातील चिठ्ठी नजरेला पडली. वाचता वाचता तिने सुनेला मिठीत घेतले. चिठ्ठी स्वतःच्या नवऱ्याच्या हातात दिली, सासरे चष्मा नसल्याने मुलाला म्हणाले, बघ काय आहे. सारे घर स्तब्ध झाले.

"अरे मूला ही चिठ्ठी फ्रेम कर, ती माझ्या मुलीला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे. देवालयाच्या बाजुलाच याची फ्रेम लाव" असं सासू म्हणाली.
अन् खूप दिवस ती फ्रेमच सातत्याने दरवळत राहीली पुडा संपला तरीही.
     यालाच म्हणतात संस्कार