आजच्या काळात पैशाची बचत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र पैशाची बचत करणे प्रत्येकालाच सहज शक्य होत नाही. बाजारात सुद्धा पैशाची बचत करण्यासंबंधी अनेक स्कीम असतात, मात्र आज आम्ही तुम्हाला पोस्टाची एक जबरदस्त स्कीम सांगणार आहोत. या स्कीमच्या माध्यमातून दररोज एक निश्चित रक्कम सेव्ह केल्यानंतर तुम्ही काही वर्षातच लखपती बनाल. यासाठी तुम्हाला फार मोठी रक्कम सेव्ह करण्याची गरज नाही. तुम्हाला दररोज फक्त दोनशे रुपयांची बचत करायची आहे.
काही वर्षातच जमा होईल 21 लाखांचा फंड
दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या बचतीची सवय तुम्हाला भविष्यातील एक मोठी जमापुंजी जमा करण्यासाठी मदत करत असते. हाच बचतीचा मार्ग तुम्हाला इथे अवलंबायचा आहे. रोजच्या खर्चातून फक्त दोनशे रुपये तुम्हाला सेव्ह करायचे आहेत. आज केलेली ही बचत येत्या काही वर्षात तुम्हाला लखपती बनवू शकते आणि या बचतीच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकता. पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट म्हणजेच पीपीएफ हा सद्यस्थितीचा बचतीचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या या अकाउंटमध्ये रोज दोनशे रुपयांची बचत करायची आहे. जर तुम्ही रोज हे करू शकला, तर स्किम संपेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये 21 लाखांचा फंड जमा झालेला असेल.
कोणत्याही शाखेत हे अकाउंट ओपन करू शकता

पोस्ट ऑफिसच्या देशभरातील कोणत्याही शाखेत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही एकापेक्षा अधिक अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. याशिवाय दोन व्यक्ती मिळून सुद्धा हे अकाउंट तुम्ही ऑपरेट करू शकता.
असे मिळतील 21 लाख रुपये
समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही आजपासून आपल्या दैनंदिन जीवनातील रकमेतील दोनशे रुपये रुपयांची बचत करत आहात. ही अशी बचत तुम्हाला पंधरा वर्ष करायची आहे. पंधरा वर्षानंतर तुम्हाला 21 लाखांचा मोबदला मिळणार आहे.
कसा तयार होईल फंड
1. या स्कीमच्या माध्यमातून जर तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत करू इच्छिता तर याप्रमाणे महिन्याचे सहा हजार रुपये होतात, म्हणजेच एका वर्षाचे झाले 72 हजार रुपये.
2. जर तुम्ही अशा पद्धतीने लागोपाठ पंधरा वर्षे बचत केलीत तर 15 व्या वर्षापर्यंत तुम्ही बचत केलेली रक्कम 10 लाख 80 हजार रुपये इतकी असेल.
3. तुम्ही जमा केलेली रक्कम ही पीपीएफ अकाउंट मध्ये असल्यामुळे त्या रकमेवर वार्षिक 8 टक्क्यांनी तुम्हाला व्याज मिळेल. ही व्याजाची रक्कम तुम्ही जमा केलेल्या रकमेत समाविष्ट केली जाईल.
4. याच पद्धतीने पंधरा वर्ष त्या रकमेवर व्याज मिळाल्यानंतर तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम 21 लाख रुपये असेल.
5. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही केलेल्या बचतीवर तुम्हाला तब्बल 10 लाख 31 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला 10 लाख 31 हजारांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.

शंभर रुपये भरून हे अकाउंट ओपन करू शकता
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला हे अकाउंट ओपन करायचे असेल तर यासाठी फक्त तुम्हाला शंभर रुपये भरावे लागतील. कारण पोस्ट ऑफिसमध्ये हे अकाउंट ओपन करण्याची फी फक्त शंभर रुपये आहे. असे असले तरी या अकाउंटमध्ये वर्षभरात कमीत कमी पाचशे रुपये सेव्ह करणे अनिवार्य आहे. याशिवाय एका वर्षात तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंतची रक्कम सेव्ह करू शकता. हे अकाउंट तुम्ही जॉईंट अकाउंट म्हणून देखील ओपन करू शकता. तसेच आपल्या मुलांच्या नावानेसुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. मात्र सध्या यामध्ये प्रीमॅच्युअर विड्रॉलची सुविधा उपलब्ध नाही.
काय मग कशी वाटली पोस्टाची ही भन्नाट स्कीम. आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र मैत्रिणींना सुध्दा याची माहिती द्यायला विसरू नका.

सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती...

सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती...


*नियम व अटी आपल्यालाही लागु आहेत.*

1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ?
*एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन,

रजा नियम, महत्वाच्या तरतुदी व रजेचे GR


महाराष्‍ट्र राज्य  नागरी सेवा (रजा) नियम १९८१

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्‍य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्‍वारा जाहीर केलेल्‍या सण व इतर सुट्‍ट्‍या वगळून प्रतीवर्ष महाराष्‍ट्र नागरी सेवा रजा  नियम १९८१ अन्‍वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्‍य झाल्‍यावर रजा घेता  येते.

F सुट्‍टी म्हणजे काय : महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२३) अन्‍वये,
(१) परक्राम्‍य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्‍वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेली सुट्‍टी.
(२) शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्‍वारा, शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्‍याचा दिलेला आदेश याला सुट्‍टी असे संबोधण्‍यात येते.

F रजा म्हणजे काय : महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) अन्‍वये, सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.

F रजा व रजेचा हक्‍क: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १० अन्‍वये,
(१) सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.
(२) हक्‍क म्‍हणून रजा मागता येत नाही.
(३) रजा मंजूर करण्‍यास सक्षम अधिकारी, लोकसेवेच्‍या निकडीमुळे, कोणत्‍याही प्रकारची रजा नाकारू शकतो किंवा रद्‍द करू शकतो. शासकीय कर्मचार्‍यास लेखी विनंती खेरीज, देय असलेल्‍या आणि मागितलेल्‍या रजेचा प्रकार बदलता येणार नाही.  

F अखंडीत रजेची कमाल मर्यादा किती : महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १६ अन्‍वये, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही.  

रजेचे नाव आणि नियम
किती दिवस
शेरा
अर्जित रजा (भर पगारी)
(Earned Leave)
(नियम क्र. ५० अन्‍वये)
एकूण ३०० दिवस
(एका वेळी सलग १८० दिवस रजा )
प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रत्‍येकी १५ दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात अर्जित रजा आगाऊ जमा करतात .  
एकूण कामाचे दिवस * गुणीले १/११= येणारे दिवस.
(३०० दिवसापर्यंत रजा खात्‍यात जमा करुन ठेवता येऊ शकते .)
अर्ध पगारी  रजा (Half pay Leave)
(नियम ६० अन्‍वये)
सेवेच्‍या पूर्ण केलेल्‍या प्रत्‍येक वर्षासाठी २० दिवस
प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी, प्रत्‍येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात आगाऊ जमा होते. यात निलंबन काळ धरू नये.
परिवर्तीत रजा (Commuted Leave)
(नियम ६१ अन्‍वये)
देय असलेल्‍या अर्ध वेतनी रजेच्‍या निम्‍मे दिवस
देय अर्धपगारी रजा दुप्‍पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्‍या दुप्‍पट दिवस खर्ची पडेल)
अनिर्जित रजा (Leave not due)
(नियम ६२ अन्‍वये)
वैद्‍यकीय प्रमाणपत्र असल्‍यास, जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित होण्‍याची शक्‍यता असेल तितके दिवस
एकूण सेवेत कमाल ३६० दिवस.
एका वेळेस ९० दिवस. संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस.
असाधारण रजा  ( Asadharan Raja)
(Extraordinary Leave)
(नियम ६३ अन्‍वये)
तीन वर्ष  सतत सेवा पूर्ण –
६ महिने.
पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने.
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी – १८ महिने.
रजा खात्‍यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन. वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.
परिविक्षाधीन कर्मचार्‍यास रजा  (probation)
(नियम क्र. ६४ अन्‍वये)
                 --
अनुज्ञेय रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
त्‍यापेक्षा जास्‍त रजा घेतल्‍यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.
निवृत्तीपूर्व रजा 
( Retirement)
(नियम ६६ अन्‍वये)
सलग १८० दिवस किंवा एकूण सेवा कालात २४ महिने.
नियत सेवा निवृत्तीच्‍या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन कमाल १८० दिवस. कमाल २४ महिने.
प्रसूती रजा बाळंतपण 
(Maternity )
(नियम ७४ अन्‍वये)
कायम सेवेत असणार्‍या महिला कर्मचार्‍यास, दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्‍या तारखेपासून १८० दिवस.
किमान सेवेची अट रद्‍द करण्‍यात आली आहे. दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्‍या महिला कर्मचार्‍यास सहा महिन्‍याच्‍या वेतनाच्‍या रकमेइतका बाँड द्‍यावा लागेल.
¨अनाथ मुल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यास - ९० दिवस विशेष रजा अनुज्ञेय आहे.
¨सरोगसी पध्‍दतीने जन्‍मलेल्‍या आपतत्त्‍याचे संगोपन करण्‍यासाठी महिला कर्मचार्‍यास आपत्त्‍याच्‍या जन्‍म दिनांकापासून - १८० दिवस.
सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे. अशा महिला कर्मचार्‍यास आपत्‍य नसावे तसेच तिने मुल दत्तक घेतलेले नसावे.
गर्भपात रजा (Garbhapat)
(नियम ७४(५) अन्‍वये)
वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.
सहा आठवड्‍यापेक्षा जास्‍त होणार नाही इतकी रजा.
अपघाती/विशेष विकलांगता रजा
(Special Disability leave for Accidental Injury)
(नियम ७५ व ७६ अन्‍वये)
पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        
¨अपघाती रजा २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
¨विशेष विकलांगता रजा १२० दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
रुग्‍णालयीन रजा
(Hospitalised)
(नियम ७७ अन्‍वये)
पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        
२८ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

क्षय रोग/कर्क रोग/कुष्‍ठ रोग/ पक्षघात रजा(T.B.,Cancer, Leprosy, Paralysis )(नियम ७९ अन्‍वये)
रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून
तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय
१२ ते २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही
अध्‍ययन रजा शिक्षणासाठी रजा (Study Leave)
(नियम ८० अन्‍वये)
लोकसेवेची निकड, कर्तव्‍य क्षेत्राशी संबंधीत उच्‍च-शिक्षणासाठी, पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय
संपूर्ण सेवा कालात १२ ते २४ महिने.
नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक.
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual )
पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास.
२१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)


विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
स्‍वत: नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
एकदा केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
स्‍त्री कर्मचार्‍याने बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
स्‍त्री कर्मचार्‍यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याने स्‍वेच्‍छेने विनामूल्‍य रक्‍तदान केल्‍यास
कर्मचार्‍यास १ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
राष्‍ट्रीय क्रिडा स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी
कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (क्रिडा अधिकार्‍याचा दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर किंवा अन्‍य वेळी केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
नैमित्तिक/किरकोळ रजा
(Casual Leave)
(अचानक, आपत्‍कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा.
अत्‍यंत  निकड असतांना काढली जाते.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस  साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच दहा दिवसा वाढविता येते.
(किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे,नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये.   
किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजा घेता येत नाहीत.
सार्वजनिक सुट्‍टी जोडून घेता येते.
सेवापुस्‍तकात नोंद घेता येत नाही. स्‍वतंत्र नोंदवही ठेवावी.
मोबदला सुट्‍टी
निम्‍नश्रेणी कर्मचार्‍यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्‍यास अनुज्ञेय नाही.
सुट्‍टीत केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून देतात. 
एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्‍त साठवता येत नाही. पुढीलवर्षी उपयोगात आणता येत नाही.
विपश्‍यनेसाठी रजा
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते.
तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळात सहा वेळा.
F रजा संपल्‍यानंतर विनापरवानगी  गैरहजर राहणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरतो . (नियम क्र ४९)

www.facebook.com/yogeshnarayanchoudharihttps://twitter.com/ynchoudhari